मालवणात २ सप्टेंबरला तालुकास्तरीय शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धा

मालवण : राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्ताने  रोटरी क्लब मालवण यांच्यावतीने गुरुवार दि. २ सप्टेंबर रोजी.दुपारी ४ वाजता हॉटेल जानकी कुंभारमाठ  येथे मालवण तालुका मर्यादित शाकाहारी पौष्टिक नाश्ता पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा डॉ. लीना लिमये यांनी पुरस्कृत केली आहे. 
या स्पर्धेला कोणतीही वयाची अट नाही .शाकाहारी नाश्त्याची पाककृती स्पर्धकाने घरी बनवून आणायची आहे. पाककृती बनवत असतानाचा आपला व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवावा. चव ,घटक व मांडणी यानुसार स्पर्धेत गुण दिले जातील. या स्पर्धेसाठी फक्त पौष्टिक पाककृती बनवायची असून कोणत्याही प्रकारची चायनीज पाककृती किंवा संबंधित  घटक वापरायचे नाहीत. स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे १५०० रुपये, आकर्षक चषक व प्रमाणपत्र, १२०० रुपये व प्रमाणपत्र, १००० रुपये व प्रमाणपत्र अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी स्पर्धकांनी ३० ऑगस्ट पर्यंत  राे. डाॅ. लिना लिमये- ९४२२०७६८०५ यांच्याकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे .

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!