तोंडवळी वाळू उपसा विषयात उबाठाच्या स्थानिक मंडळींकडून राजकारण आणण्याचा प्रयत्न !

गावातील काही उबाठाच्या मंडळींकडून ग्रामस्थांना चुकीची माहिती देत वातावरण बिघडवण्याचे काम सुरु

नियमात राहूनच गावात सुरु आहे वाळू उपसा : तोंडवळी, हडी गावातील वाळू व्यवसायिकांनी मांडली भूमिका

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील तोंडवळी गावात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून ठरवून दिलेल्या जागेत आणि ठरवून दिलेल्या कोट्यानुसार आम्ही सनदशीर मार्गाने वाळू काढत असताना तोंडवळी गावातील काही उबाठाच्या मंडळींनी गावातील ग्रामस्थांना चुकीची माहिती देत वातावरण विघडविण्याचे काम केले आहे. याविषयात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तोंडवळी आणि हडी गावातील वाळू व्यवसायिकांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत केला. शासनाला अधिकृतपणे महसूल रक्कम भरणा केल्यानंतरच आम्हाला वाळू उपसा करण्यास परवानगी व जागा निश्चीत करून देण्यात आलेली आहे. असे असताना आम्हाला त्रास देण्याचे प्रकार होत आहेत. आमच्या होड्यांचे नांगर कापून टाकण्यात आलेले आहेत. काही वेळा आमच्या कामगारांवर दगड मारण्याचेही प्रकार होत आहेत. तरीही आम्ही शांतपणे आमचा व्यवसाय करत आहोत. यामुळे प्रशासनाने आम्हाला अधिकृतपणे संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

येथील कान्हा रसोई याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत वाळू व्यावसायिक बोलत होते. यावेळी त्यांनी शासनाने निश्चीत केलेले टेंडर, अधिकृतपणे महसूल भरल्यानंतर घेण्यात आलेले टेंडर याची सविस्तर माहिती दिली. यावेळी गणेश तोंडवळकर, राजेश शेडगे, मालोजी हडकर, अरूण खोत, प्रशांत मिसळे, राहुल मिसळे, ऋषी आसोलकर तसेच इतर वाळू व्यावसायिक उपस्थित होते. ग्रामस्थ व आम्ही एकाच गावातील आहोत. वाळू उपसा झाला नाही तर पुराचा धोका वाढणे यांसह अन्य बाबींचा विचार करून प्रशासनाकडून आम्हाला अधिकृतपणे परवानगी देण्यात आलेली आहे, आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काहीही करणार नाही. असेही वाळू व्यावसायिकांनी सांगितले.

आम्ही आणि आंदोलनकर्ते ग्रामस्थ एकाच गावातील आहोत. आम्ही अधिकृतपणे व्यवसाय करत असताना आम्हाला त्रास देण्यासाठी उबाठाची मंडळी प्रयत्नात आहेत. आम्ही ग्रामस्थांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही वाळू काढणार आहोत, मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रातील बी ३ यां गटातील गाळस दृश्य वाळूचे उतखनन करण्यासाठी आम्हाला प्रशासनाने परवानगी दिली. सर्व कागदपत्रे व लाखो रुपये महसूल रक्कम भरणा केल्यानंतर आम्हाला परवाना देण्यात आला. मात्र यादरम्यान खाडी पात्रात ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यामुळे मालवण तहसीलदार मॅडम यांनी आम्हाला १६ ते १९ जानेवारी या चार दिवस वाळू उपसा करू नये असे सांगितले. आमचे नुकसान सहन करून आम्ही आदेशाचे पालन केले. आम्ही सर्व स्थानिक असून या व्यवसायात अनेक वर्षे असून शासनाच्या नियम अटी तसेच परवाना घेऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतो. अनेक कुटुंब या व्यवसायात आहेत, असेही वाळू व्यावसायिकांनी सांगितले.

शासनाने ज्या क्षेत्रात वाळू उपसा सांगितला, त्या क्षेत्राची आज ग्रामस्थ व आमच्या उपस्थितीत अधिकारी यांनी हद्द निश्चित केली. तरी आम्हाला दिलेल्या परवाना नुसार वाळू उतखनन करण्यास मिळावे. काही ग्रामस्थ यांचा याठिकाणी विरोध होता, मात्र सर्वासमोर खाडीतील हद्द निश्चित झाली. ग्रामस्थ यांच्या काही मागण्या आहेत. त्यातील सकारात्मक योग्य बाबींचा प्रशासनाने निश्चित विचार करावा, आम्हीही आमच्या वतीने सहकार्य निश्चित करू. कारण सगळे ग्रामस्थ आमचेच आहेत. गावे आपली आहेत. त्यामुळे आम्हाला वाद करायचे नाहीत. आमचीही भुमिका शांततेची आहे. प्रशासनाला सहकार्य करायची आहे.

आम्ही ग्रामस्थांच्या भूमिकेचा आदर करतो. आम्हाला परवाना मिळाला आहे, त्या बी ३ या क्षेत्रात वाळू उत्खनन करण्यास प्रशासननाने अटकाव करू नये. आम्ही भरलेले पैसे, देण्यात आलेला परवाना या सर्वांचा विचार व्हावा. आम्ही व्यावसायिक हे स्थानिक आहोत. अनेक जण एकत्रित येऊन व्यवसाय करतो. अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यांनी एकत्र येऊन शासनाच्या परवानगीने एकत्रित व्यवसाय करण्याचे यां उद्देशाने पैसे भरले. होड्या, कामगार व अन्य साहित्य आणले. याचा विचार शासनाने करावा, असेही वाळू व्यावसायिक म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!