मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनचा फक्त “सांगाडा” ; मुलांचे शैक्षणिक नुकसान
निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेला नवीन स्वप्ने दाखवण्यात व्यस्त : मात्र जिल्ह्याची सद्य परिस्थिती भयावह : मंदार केणी यांची टीका
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मालवणच्या शासकीय तंत्रनिकेतनला भेट देऊन येथील समस्यांचा आढावा घेतला. याठिकाणी केवळ इमारतीचा सांगाडा असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेला नवीन स्वप्ने दाखवण्यात व्यस्त असले तरी जिल्ह्याची सद्य परिस्थिती भयावह असल्याची टीका मंदार केणी यांनी केली आहे.
मंदार केणी यांच्यासह माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी शासकीय तंत्रनिकेतनला भेट देऊन आढावा घेतला. मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील मुलांच्या भवितव्याशी शासनाने खेळ चालू आहे. मुलाना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने मुलाचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही. कित्येक विषयाचे शिक्षक नाहीत. तात्पुरत्या घेतलेल्या शिक्षकांच्या कायदेशीर लढाईमुळे शिक्षक घेऊ शकत नाही. अस कारण प्रशासन देत आहे. परंतु यात तोडगा काढण्यात महाराष्ट्र राज्य सरकार अपयशी ठरल आहे. लॅब चालवण्यासाठी कर्मचारी नाहीत, स्टाफ नाही. शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. असलेले शिक्षक त्यांच्याकडे अतिरिक्त प्राचार्यांचा चार्ज असल्याने प्रचंड दडपणाखाली काम कराव लागतय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेला नवीन स्वप्न दाखवत आहेत. पण या जिल्ह्याची सद्य परिस्थिती भयावह असल्याचे मंदार केणी यांनी म्हटलं आहे.