नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा शिवसेनेवर टीका करण्यासाठीच आहे का ? आ. वैभव नाईक यांचा सवाल 

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पुर आला, लोकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी राणे आले आणि मला पंतप्रधानांनी पाठवलय म्हणून सांगितले आणि पूरग्रस्ताना मदत करू म्हणाले. माञ विमानतळावर उतरल्या पासून राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केले आहे. गेल्या दिड महीन्यात राणेंनी पूरग्रस्ताना दमडी सुद्धा दिली नाही. कोकणात एखादा नवीन प्रकल्प किंवा एखादी नवीन योजना आणण्याची घोषणातरी केली का ? फक्त शिवसेनेनेवर टीका करण्यासाठीच ही जनआशीर्वाद याञा आहे का? असा सवाल आ. वैभव नाईक यांनी केला आहे. या याञेला लोकांचा आशिर्वाद मिळणार नसून लोकांचा आशिर्वाद राणेंनी दहा वर्षां पुर्वीच गमावल्याची टीका देखील आमदार नाईक यांनी केली आहे. कणकवली येथे ते पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणे भाजपच्या पदराआड राहून मोदीजींचं  नाव सांगून शिवसेनेवर आरोप करण्यासाठी फिरत आहेत. भाजपच्या काही लोकांना अजूनही शिवसेना आणि भाजपने एकञ यावे असे वाटते. म्हणून भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करीत नाहीत. माञ अशा बाडग्यांना शिवसेनेवर आरोप करण्यासाठी ही जनआर्शिवाद याञा असल्याचा आरोप आ.वैभव नाईक यांनी केला आहे.१९९१ साली शिवसेनेने मुंबई वाचवली होती. हिंदू लोकांना वाचविले होते. आजही मुंबईच्या जनतेला माहिती आहे की शिवसेना नसेल तर मात्र मुंबईत हिंदूंचे, मराठी माणसांचे काही खरं नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला तालिबानी संस्कृती म्हटले तरी जनता ही शिवसेनेच्या पाठीशी राहील असे ते म्हणाले. खरतर बाळासाहेबांच्या पुढे अनेक लोकांच्या माना झूकल्या अनेक लोक नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, प्रणव मुखर्जी असतील किंवा त्या वेळेची ग्यानी झेलसिंग असतील. देवेंद्र फडणवीस यांचा बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी मोठा हातभार आहे, हे आम्ही नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस येणार म्हणून स्मारकाच्या ठिकाणी परवानगी दिली. माञ स्मारकाच्या ठिकाणी येऊन सुध्दा नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते आवडले नाही म्हणून त्यांनी गोमूत्र शिंपडले. कारण ते बाळासाहेबांचे कार्यकर्ते होते. बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी देशातील लाखो जनता त्याठिकाणी आली. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले. परंतु नारायण राणेंना त्या वेळी तीथे येण्याची हिम्मत झाली नाही. आज मात्र केंद्रीय मंत्री पदाच्या पदराआड किंवा भाजपच्या पदराआड  दर्शन घेतले. पण दर्शन घेताना सुध्दा त्यांना बाळासाहेबांचे विचार कधी समजले नाहीत. अश्याना घेऊन भाजप वाढत असेल तर त्याचा लखलाभ भाजपला व्होवो. माञ शिवसेना आजही ठामपणे उभी आहे आणि उद्याही राहील, असे आमदार नाईक यांनी म्हटले आहे. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!