आ. निलेश राणे “ऑन ड्युटी २४ तास” ; रात्री उशिरा मालवण शहराचा स्पॉट पंचनामा

बंदर जेटीसह मच्छिमार्केट मधील अस्वच्छतेची केली पाहणी ; बांगीवाडा येथील पालिकेच्या रखडलेल्या कर्मचारी वसाहतीला देखील भेट

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ मालवण मतदार संघात आमदारकीची सूत्र हाती घेतल्यानंतर निलेश राणे यांनी रखडलेल्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी धडाका हाती घेतला आहे. त्यासाठी ऑन ड्युटी २४ तास ते कार्यरत असून बुधवारी रात्री त्यांनी मालवण शहराचा स्पॉट पंचनामा केला. बंदर जेटीसह मच्छिमार्केट मधील अस्वच्छतेची त्यांनी पाहणी करत या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. बांगीवाडा येथील पालिकेच्या रखडलेल्या कर्मचारी वसाहतीला देखील त्यांनी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

मालवण बंदर जेटी येथील बंद लाईट, मालवण मच्छी मार्केट परिसरातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, सेल्फी पॉईंटची दुरावस्था, कचरा व्यवस्थापन मशीन व पर्यटकांसाठी बंदर जेटीवरील प्रसाधनगृहाची त्यांनी पहाणी केली. मालवण बंदर जेटी परिसरात चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी ही पहाणी करण्यात आली. बंदर जेटी स्वच्छ सुरक्षित आणि आकर्षक बनविण्यासाठी काय करता येईल याची माहिती घेतली. मच्छीमार्केट परिसराची दुरावस्था झाली असून येथे कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. याबाबत प्रशासनासोबत बोलणार असल्याचे ते म्हणाले. 

शहरातील बांगीवाडा येथील मालवण नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथे नवी इमारत उभारणी सुरु असून हे काम रखडले आहे. पाहाणी त्यांनी पहाणी करत माहिती जाणून घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवामोर्चा शहरप्रमुख ललित चव्हाण, निषय पालेकर, अमोल केळुसकर, किसन मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!