दत्ता सामंतांचा उबाठाला धक्का ; ओवळीये सरपंचांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश

माजी सभापती सुनील घाडीगावकर, दादा परब यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण तालुक्यातील ओवळीये गावात उबाठा शिवसेनेला धक्का दिला आहे. येथील सरपंच रंजना सहदेव पडवळ यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह मंगळवारी रात्री दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेत प्रवेश केला. श्री. सामंत यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

सरपंच रंजना घाडीगांवकर यांच्यासह सहदेव मोहन पडवळ, अमोल महादेव घाडीगावकर, अजित जंगम, नागेश शंकर घाडीगावकर, संकेत शशिकांत घाडीगावकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगांवकर, दादा परब, समीर सावंत, पप्पू निर्गुण, बबन परब, नंदू आंगणे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!