एसटी कर्मचाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे

भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघ सिंधुदुर्ग विभागाचे आवाहन ; संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली निलेश राणेंची भेट

मालवण | कुणाल मांजरेकर

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात महायुती आणि राणे कुटुंबीय त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहे. त्यामुळे कुडाळ मालवण मतदार संघात महायुती कडून निवडणूक रिंगणात उभे असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांना एसटी कर्मचाऱ्यानी मोठ्या संख्येने मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघ सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

२० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणूक दरम्यान कुडाळ -मालवण मतदार संघांचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा तसेच भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष  एसटी महासंघ संघटनेच्या वतीने निलेश राणे यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रचाराबाबत आढावा देण्यात आला. यावेळी एस टी कर्मचारी यांनी निलेश राणे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. कुडाळ आणि मालवण येथील बांधकाम कामगारांना भांडी वाटपासहित अन्य लाभ मिळालेल्या लाभार्थ्याशी संपर्क साधण्यात आला.  तसेच मालवण कुडाळ येतील एसटी कर्मचाऱ्यांशी प्रत्येक संपर्क साधून त्यांना २० नोव्हेंबर मतदान करण्यासाठी आगार व्यवस्थापक याच्याशी संपर्क साधून त्यांच्या ड्युट्या ऍडजेष्ट करण्यात आल्या आहेत. कोणी कामगार मतदानापासून वंचित राहणार नाहीत, यांचे नियोजन करण्यात आले. तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्याच्या मतदानाचे नियोजन करण्यात येत आहे. जे कामगार जिल्हाबाहेर आहेत त्यांना मतदाना साठी आणण्याचे नियोजन करण्यात आले. या बाबाताची माहिती देऊन निलेश राणे यांच्या सुचने प्रमाणे आणि मार्गदर्शना प्रमाणे पुढील कामकाज करण्यात येत आहे.

यावेळी भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे अध्यक्ष अशोक राणे, भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कामगार संघचे विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, सेवा शक्ती संघर्ष एटी कामगार संघचे विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय कार्यकारणी सदस्य प्रशांत गावडे, सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघ कुडाळ आगारचे कार्याध्यक्ष अरविंद जळवी, सदस्य रवींद्र चव्हाण, रघुनाथ तेंडोलकर, चंद्रकांत चव्हाण तसेच कामगार मोर्चाचे पदाधिकारी व सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघाचे सभासद उपस्थित होते, अशी माहिती समीर कदम सेवाशक्ती संघर्ष एस टी कामगार संघ कुडाळ आगार प्रसिद्धी प्रमुख यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!