राठीवडेत उबाठाला धक्का ; दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील राठिवडे येथील उबाठा शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कुडाळ मालवणच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
यावेळी दत्ता सामंत यांच्यासह युवा उद्योजक विनायक बाईत, निलेश बाईत, प्रशांत परब, भाऊ राऊत यांच्यासह भाजप व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेशकर्त्यांमध्ये सुशांत धुरी, जितेंद्र धुरी, सूर्यकांत धुरी, स्नेहा धुरी, हर्षल मेस्त्री, सुधीर मेस्त्री, गणेश मेस्त्री, शिवराम मेस्त्री, संदीप मेस्त्री, जितेंद्र मेस्त्री, अभिषेक मेस्त्री, नितीन धुरी, आकाश राठोड, जयवंत धुरी, विजय धुरी, जयश्री पवार, सुनीता चव्हाण, मनोहर शेट्ये, शशिकांत शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, रविकांत शेट्ये, प्रणाली शेट्ये, सुनीता तावडे, बाबू तावडे, दिगंबर धुरी, मालिनी धुरी, वैभव गोसावी, सावनी धुरी, अनिल धुरी, राकेश धुरी, सत्यवान धुरी, राजेंद्र मेस्त्री, विजया धुरी, नागेश पवार, सुरेश पवार, रमेश पवार यांचा समावेश आहे.