वराड येथील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

कुडाळ – मालवण मतदार संघात मनसेची मते निर्णायकच ठरतील ; उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर

मालवण : मालवण तालुक्यातील वराड येथील तरुणांनी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत राजसाहेबांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार खा. नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी मनसेचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास श्री. वाईरकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रवेशकर्त्यांमध्ये प्रणित चव्हाण, प्रवेश यादव, अनिकेत रणसिंग, तुषार रणसिंग, प्रसाद म्हसकर, ओमकार म्हसकर, अरुण तार्वे आदींचा समावेश आहे. यावेळी मनसे शहर अध्यक्ष सागर जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत मनसेचा उमेदवार नसताना सुद्धा अनेक तरुण मनसेत प्रवेश करत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आजचा हा प्रवेश आहे. कारण आजच्या तरुण पिढीला राज ठाकरे या नेतृत्त्वावर विश्वास आहे. भविष्यात राज ठाकरेच या महाराष्ट्राच भविष्य घडवू शकतात या गोष्टीवर आजच्या तरुण पिढीचा ठाम विश्वास आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मनसेची भूमिका ही निर्णायक असेल यात कोणतेही दुमत नाही. येत्या काळात सुद्धा कुडाळ-मालवण मतदार संघाचा आमदार कोणी झाला व सत्तेत कोणी असले तरी जनतेच्या प्रश्नासाठी प्रशासनावर वचक हा मनसेचाच राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3808

Leave a Reply

error: Content is protected !!