महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार
सावंतवाडीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक
सावंतवाडी | सिद्धेश पुरळकर
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना प्रचंड बहुमतांनी निवडुन आणण्यासाठी सावंतवाडी शहरातील महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राजन तेली व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी राजन तेली यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विधानसभा प्रमुख – रूपेश राऊळ, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), तालुका प्रमुख मायकल डिसोजा, सावंतवाडी महिला शहर प्रमुख श्रुतिका दळवी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड राघवेंद्र नार्वेकर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, कोकण विभागीय अध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट सचिन पाटकर, बाबल्या दुभाशी, माजी नगरसेविका सौ. अफरोज राजगुरु, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर आदी महाविकास आघाडीमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.