वर्देत भाजपाचा पलटवार ; उबाठा गटाचे माजी सरपंच सदाशिव पालव कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल

खासदार नारायणराव राणे, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांची उपस्थिती ; उबाठा गटाच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख मानकरी भाजपात

गावचा विकास करण्यात आमदार वैभव नाईक अपयशी ठरल्याचा आरोप ; गावच्या शाश्वत विकासासाठी भाजपात आल्याची प्रतिक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ तालुक्यातील वर्दे गावात उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला आहे. येथील माजी सरपंच सदाशिव पालव यांनी वर्दे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य मनोज जाधव व संपदा जाधव यांच्यासह खासदार नारायण राणे व महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गावचा विकास करण्यात आमदार वैभव नाईक हे अपयशी ठरले असून शाश्वत विकासासाठी आम्ही सर्वांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर गावचे विकासात्मक प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील, अशी ग्वाही यावेळी निलेश राणे यांनी दिली. 

यावेळी माजी सदस्य सुरेश पालव, वर्दे गावचे मानकरी जयप्रकाश पालव, चंद्रशेखर पालव, सिद्धेश पालव यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी ओरोसचे मंडल अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस देवेन सामंत, माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष तुषार सावंत, गुंडू सावंत बुवा, हरिश्चंद्र गायतोंडे, योगेश परब, सुधीर सावंत, अरविंद परब, लक्ष्मण कदम, संजय कदम आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3811

Leave a Reply

error: Content is protected !!