सिंधुदुर्गातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या (CHO) नियुक्तीचा प्रश्न मार्गी
भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारीच जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी केली होती चर्चा
३५ पेक्षा जास्त स्थानिक युवक युवतींच्या नियुक्तीचा मार्ग झाला मोकळा
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत नव्याने भरण्यात आलेल्या समुदायीक आरोग्य अधिकारी Community Health Officer (CHO) यांच्या नियुक्ती संदर्भातील महत्वाचा मुद्दा मार्गी निघाला असून त्यांच्या नियुक्ती पत्रांवर जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षरी करत त्यांच्या नेमणुकीसंदर्भातील आदेश दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ पेक्षा जास्त स्थानिक युवक युवतींचा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या संदर्भात सोमवारी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेतली होती. त्यानंतर मकरंद देशमुख यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश देत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज नेमणूक दिली आहे.