चिंदर तलाव सुशोभीकरण व पायाभूत विकासासाठी ५ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता
खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजुरी ; भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मानले आभार
मालवण : प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2024-25 अंतर्गत मालवण तालुक्यातील चिंदर तलाव सुशोभीकरण व पायाभूत विकास करणे या कामासाठी ५ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला आहे. अनिकेत पटवर्धन यांनी देखील जातीनिशी लक्ष घालुन हे काम मंजूर करुन घेतले. चिंदर गावाच्या विकासासाठी पर्यटन दृष्ट्या हे महत्वाचे पाऊल असून ग्रामस्थांच्या वतीने महायुती सरकारचे आपण आभार मानत असल्याची प्रतिक्रिया भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केली आहे.