मालवणातील लहान मासेमारी बंदरांचा विकास होणार ; १ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी मंजूर

मालवण : जिल्हा वार्षिक योजना सन २०२४/२५ अंतर्गत मालवण तालुक्यातील लहान मासेमारी बंदरांचा विकास करणे या लेखाशीर्ष अंतर्गत १ कोटी ६० लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. यासाठी भाजपा नेते निलेश राणे यांनी सर्जेकोट, रेवतळे, देवबाग, दांडी, आचरा तळशील येथे मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्या मागणीनुसार या कामांची शिफारस खासदार नारायणराव राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार रवींद्र यांनी हा निधी मंजूर केला आहे.

मालवण तालुक्यातील विकासकामांसाठी १ कोटी ६० लक्ष एवढा निधी मंजूर केला असून त्यात, आचरा बंदर कस्टम ऑफिस येथील अस्तित्वातील जेट्टीची लांबी वाढविणे २० लक्ष, आचरा पिरवाडी येथे मच्छिमार जेटी बांधणे. २० लक्ष, तळाशील खालची तोंडवली येथील नरेंद्र मेस्त यांच्या घरानजीक जेठी बांधणे. ता. मालवण २० लक्ष, दांडी मालवण श्रीकृष्ण मंदिर चौकचार मंदिर ते दक्षिणेकडे स्लोपिंग कम जेटी बांधणे. ता. मालवण ३० लक्ष, देवबाग निकमवाडी खाडी किनारी बंदर जेठी बांधणे. ता. मालवण २० लक्ष, देवबाग निकमवाडी येथे खाडी किनारी मच्छिमारांना मासे उतरविण्यासाठी स्लोपिंग रॅम्प बांधणे. २० लक्ष, रेवतळे मालवण येथे भोजने घर नजिक स्लोपिंग कम जेटी बांधणे. १० लक्ष, सर्जेकोट येथे अस्तित्वातिल जेटीची लांबी वाढविणे, स्लोपिंग जेटी बांधणे. २० लक्ष या कामांचा समावेश आहे. 

मालवण किनारपट्टीचा प्राधान्याने विचार करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपा नेते निलेश राणे यांचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, मालवण भाजपा सरचिटणीस महेश मांजरेकर, दाजी सावजी आदींनी आभार व्यक्त केले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!