मालवणात गोकुळाष्टमी निमित्त सुंदर कृष्णमूर्ती स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजन ; विजेत्यांना रोख पारितोषिके

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण यांच्या वतीने यंदा गोकुळाष्टमी निमित्ताने सुंदर कृष्ण मूर्ती या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या तीन क्रमाकांना रोख ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सुंदर कृष्णमूर्तीचा फोटो किंवा व्हिडीओ 9309323155 या क्रमांकावर पाठवावा. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन मनसेचे माजी शहरअध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!