विधानसभा निवडणुकीसाठी मालवण तालुका भाजपा युवा मोर्चाचे स्कॉड तयार….

तालुका कार्यकारणी, जि. प. विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर : तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, अभि लाड यांची माहिती

कुडाळ – मालवणचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयात युवा शक्तीचा मोठा सहभाग असेल : लुडबे, लाड

मालवण | कुणाल मांजरेकर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मालवणात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवकांची मजबूत फळी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने मालवण तालुक्याची कार्यकारणी आणि जि. प. विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे कुडाळ मालवणचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्या विजयात भाजपाच्या युवा शक्तीचा मोठा सहभाग असेल, अशी प्रतिक्रिया युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे आणि अभि लाड यांनी दिली आहे. 

वायरी भूतनाथ, पेंडूर, सुकळवाड विभागीय तालुका कार्यकारणीत वायरी- भूतनाथ जि. प. प्रमुखपदी राकेश सावंत, पेंडुर जि. प. प्रमुख पदी सुमित सावंत तर सुकळवाड जि. प. प्रमुखपदी दयानंद प्रभुदेसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर तालुका कार्यकारणीत उपाध्यक्ष मंदार मठकर, दयानंद प्रभूदेसाई, सोशल मीडिया प्रमूख विशाल धामापूरकर, सरचिटणीस सुमित सावंत, सुशील गावडे, चिटणीस मंदार वराडकर, राजू चव्हाण, मकरंद सावंत यांचा समावेश आहे. वायरी -भूतनाथ पं. स. प्रमुख ओंकार लुडबे, कुंभारमाठ पं. स. प्रमुख वैभव चव्हाण, पेंडुर पं. स. प्रमुख विपुल मळगावकर, वराड पं. स. प्रमुख अक्षय गावडे, सुकळवाड पं. स. प्रमुख चेतन मुसळे, पोईप पं. स. प्रमुख समीर माधव यांचा समावेश आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी दिली आहे.

मसुरे, आचरा, आडवली मालडी जि. प. विभागाच्या कार्यकारणीत मसुरे जि. प. प्रमुख संग्राम साळसकर, आचरा जि. प. प्रमुख-उमेश सावंत, आडवली मालडी जि. प. प्रमुखपदी शुभम बाक्रे यांची निवड झाली आहे. तर तालुका कार्यकारणीत उपाध्यक्ष विराज तळाशिलकर, चिन्मय तांडेल, राहुल बागवे, सोशल मीडिया प्रमूख -कुलदीप परब, शुभम बाक्रे / किशोर ठाकूर, सरचिटणीस धनंजय परब, सिद्धार कोळगे, चिटणीस जयंत घाडीगावकर, अजित राणे, शाहूलखन बांदीवडेकर यांचा समावेश आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष अभि लाड यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!