मालवण मधील संजय गांधी निराधार योजना सभेत १०४ प्रकरणांना मंजुरी

समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांची माहिती 

मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेतील ५० व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मधील ५४ असे एकूण १०४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी दिली.

संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समिती अध्यक्ष महेश मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी समिती सदस्य राजेंद्र आंबेरकर, राजेश तांबे, राजन माणगावकर, मधुकर चव्हाण, माधुरी मसुरकर, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, रुंदा पाटकर यासह संजय गांधी समिती कर्मचारी उपस्थित होते. या सभेस संजय गांधी निराधार योजनेतील ५० व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मधील ५४ असे एकूण १०४ प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. या सर्व १०४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. अजूनही जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश मांजरेकर यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!