आमदार वैभव नाईक यांच्या वतीने कोळंब पंचायत समिती उपविभागात मोफत वह्या वाटप

मालवण : उबाठा शिवसेनेचे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि उबाठा शिवसेनेच्या सहकार्यातून कोळंब पंचायत समिती उपविभाग येथील जिल्हा परिषदच्या प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा, जिल्हा परिषद शाळा हडी नं.२, जि. प. शाळा कोळंब, बाल विकास मंडळ शाळा कोळंब न्हिवे, कै. के.जी. मांजरेकर हडी नं.१, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी कोथेवाडा नं.३, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महान कांदळगाव या शाळांमध्ये सदरचे वह्या वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाची परंपरा गेली १५ वर्षे सुरू ठेवली असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये  आमदार वैभव नाईक यांनी वह्या वाटप करून सहकार्य केले आहे. येथील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन पुढे येण्यासाठी उबाठा शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे सुद्धा आमदार वैभव नाईक आणि आम्ही सर्व शिवसैनिक येथील शैक्षणिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. 

या वितरणप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, विभाग प्रमुख राजेश गावकर, महिला उपतालुका संघटक पूजा तोंडवळकर, उप विभाग समन्वयक संतोष अमरे, उपविभाग प्रमुख अमोल वस्त, मसुरे जि. प. समन्वयक सुहास पेडणेकर, युवती सेना विभाग प्रमुख आर्या गावकर, युवतीसेना शाखाप्रमुख दिक्षा गावकर, शाखाप्रमुख मयूर करंगुटकर, महिला विभाग संघटक अदिती मेस्त्री, युवासेना उपविभागप्रमुख आयवान फर्नांडिस, मामी पेडणेकर, उमेश हडकर, शशांक माने आदी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा येथील श्रीकृष्ण बागवे, श्रद्धा बागवे, प्राची गोसावी, कल्पना रेडेकर, भारती आडकर, स्नेहा शेलटकर, विनायक कोळंबकर, किसन आचरेकर, जयवंत केळुसकर आदी उपस्थित होते. जि. प. शाळा कोळंब येथील निखिल नेमळेकर, बापु बावकर, वस्त मॅडम आदी उपस्थित होते. बाल विकास मंडळ शाळा कोळंब न्हिवे येथील मुख्याध्यापक शर्मिला वळणे, स्वप्नील परब,अध्यक्ष वैदेही पाताडे, राजेंद्र दळवी आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा हडी नं.२ येथील सुतार मॅडम, गोसावी मॅडम, कदम मॅडम, पालक कमिटी अध्यक्ष अस्मी हडकर, पालक कमिटी उपाध्यक्ष चंदना लाड, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत पाटकर, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर चिंदरकर, ज्येष्ठ नागरिक रमेश कावले आदी उपस्थित होते. कै. के.जी. मांजरेकर हडी नं.१ येथील कांबळी सर, कुबल मॅडम, राणे मॅडम, कुडतरकर मॅडम, पालक कमिटी अध्यक्ष दिक्षा गावकर, उपाध्यक्ष कदम मॅडम आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी कोथेवाडा नं.३ येथील काळे मॅडम, कमिटी अध्यक्ष विनया वाडेकर, कमिटी उपाध्यक्ष मंगल हडकर, ग्राम पंचायत सदस्या प्राची मयेकर आणि उभाठा शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी पालक होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!