पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे
मालवण दि प्रतिनिधी
गेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे तालुक्याची म्हणा किंवा जिल्ह्याची म्हणा विस्कटलेली आर्थिक घडी सुधारायची असेल तर पर्यटन उद्योग व्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाचा मुख्य गाभा असणाऱ्या मालवण तालुक्याच्या पर्यटनाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी महासंघ काम करीत असून त्या कामाला सर्वांनीच हातभार लावावा असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील हॉटेल सायबा येथे पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण तालुक्याची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, मंगेश जावकर, शेखर गाड, उदय गावकर, सत्यम पाटील, जगदीश चव्हाण, प्रशांत गावकर, मेघा गावकर, अन्वेषा आचरेकर, पूनम चव्हाण, दीपाली शिंदे, भारती वाघ, विद्या फर्नांडिस, समिधा मांजरेकर, गणेश पाडगावकर, महेश मयेकर, दादा वाघ, किसन मांजरेकर, सुरेश बापर्डेकर, दादा वेंगुर्लेकर, मिलिंद परुळेकर, मिथिलेश मीठबावकर, मिलिंद झाड आदी व इतर उपस्थित होते.
याबैठकीत पर्यटन उद्योग व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत महासंघाने ग्रामपंचायतीना जो पर्यटन आराखडा बनविण्यास सांगितला आहे. त्याविषयी ग्रामपंचायतीना संपर्क साधून पाठपुरावा करण्याचे ठरले. तसेच कोरोनाच्या काळात पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. असे असताना वाढीव वीज बिलामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. वीज बिल कमी होण्याच्या दृष्टीने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांशी भेट घेण्यात यावी, तसेच लॉकडाऊनमुळे बँकांचे हप्ते भरणे पर्यटन व्यावसायिकांना शक्य झालेले नाही. कर्जाचे हप्ते भरण्याच्या दृष्टीने बँकांनी संबंधितांकडे तगादा लावल्याने शासन पातळीवर काय करता येईल याविषयीही चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बाबा मोंडकर, अविनाश सामंत,दादा वाघ,शेखर गाड , मेघा गावकर ,अन्वेशा आचरेकर, पूनम चव्हाण व इतर यांनी भाग घेतला
विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
यावेळी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचे तसेच तालुका स्तरावर समिती सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये जिल्हा वाहतूक आघाडी उपायध्यक्ष अनिल चव्हाण,
जिल्हा वाहतूक आघाडी संघटक दादा वाघ, ग्रामीण वाहतूक आघाडी उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, वाहतूक आघाडी उपाध्यक्ष उमेश बाणे, मोबाईल विक्रेता संघटना अध्यक्ष सत्यम पाटील, रिक्षा व्यावसायिक संघटना अध्यक्ष महेश मयेकर, तालुका संघटक किसन मांजरेकर, महिला आघाडी मसुरा विभाग अध्यक्ष
पुनम चव्हाण, पेंडूर विभाग अध्यक्ष श्वेता चव्हाण, शहर उपाध्यक्ष विद्या फर्नांडिस, तालुका समन्वयक दिपा शिंदे, शहर सचिव भारती वाघ, शहर समन्वयक फेनी फर्नांडिस, शहर उप समन्वयक नंदा जोशी यांची नियुक्ती करण्यात आली