अक्कलकोट वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांना पत्नीशोक

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांचे सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता दीर्घ आजाराने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. ११ जुन रोजी सकाळी ८ वाजता मानकरीवाडा, धाकटीवेस, मुरलीधर मंदिर शेजारी येथील राहत्या घरापासून निघणार आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कर्मचारी, सेवेकरी यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!