मालवणात शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेत शिवजयंती उत्साहात ; आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

मालवण : मालवण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, दीपा शिंदे, सन्मेश परब, किरण वाळके, नीनाक्षी शिंदे, उमेश मांजरेकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, सोनाली डीचोलकर, मनोज मोंडकर, महेश देसाई, महेंद्र म्हाडगुत, करण खडपे, नरेश हुले, स्वप्नील आचरेकर, भारती आडकर, मोहन मराळ, हेमंत मोंडकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!