सौरभ ताम्हणकर आणि भाजयुमो सहकाऱ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन

मालवण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्यासह अन्य सहकारी व भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, फ्रान्सिस फर्नांडीस, रोहन पेंडुरकर, नितेश पेंडुरकर, राहुल पेंडुरकर, अमित जाधव, महेश जाधव, भूषण मालवणकर, चंदन जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!