निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार कुडाळ मालवण मधील ४२ अंगणवाडी दुरुस्तीसाठी १ कोटी ५ लक्ष निधी मंजूर

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात विकासकामांनी जोर पकडला असून पुन्हा एकदा भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण ४२ अंगणवाडी दुरुस्तीसाठी १ कोटी ५ लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. 

नादुरुस्त असलेल्या अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये भरणी गावठणवाडी, भरणी सुंदरवाडी, आंब्रड बाजारवाडी, आंब्रड मोगरणे, जांभवडे भुतवड,जांभवडे शेट्येवाडी, झाराप शाळा नं.1, झाराप गावडेवाडी, पोखरण कुसबे, वरचीवाडी, पोखरण तळेवाडी, पोखरण बिबतळे, कुसबे, गिरगांव अं.क्र.२९, कुसगाव अं.क्र.६०, आंबेरी गोसावीवाडी, किनळोस, घावनळे खुटवळवाडी,ओरोस मुख्यालय, घोटगे प्रा.शाळा नं.१, निळेली केंद्र क्र.७२, बिबवणे नाईकवाडी, ओरोस सावंतवाडा, ओरोस ख्रिश्चनवाडी, तुळसुली कर्या. नारूर कदमवाडी, आकेरी तेलीवाडी, घोटगे मळेवाडी, वडाचापाट नवपाट, नांदोस चांभारवाडी, मसदे चुनवरे, असरोंडी दाडसकळ, तिरवडे, पोईप खालची पालववाडी, तारकर्ली बांध, म्हावळुंगे (मिनी), तळगांव देऊळवाडी, तळगांव पेडवेवाडी, कोळंब खालची, वरची गुरामवाडी, पेंडूर सोनारवाडी, पेंडूर मोगरणे, पेंडूर परबवाडी, मसूरे आंगणेवाडी या एकूण ४२ अंगणवाडी इमारत दुरुस्तीसाठी प्रत्येकी २ लाख ५० हजार एवढा निधी उपलब्ध झाला असून यामुळे मोडकळीस आलेल्या अंगणवाडी इमारतींना आता नवी झळाळी मिळणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!