चला धावूया रक्तदान जनजागृतीसाठी… चला धावूया प्लास्टिक मुक्तीसाठी… चला सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवणात १० मार्च रोजी महिलांसाठी मिनी मॅरेथॉन

ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “रन फॉर हेल्थ” हे ब्रीद वाक्य घेऊन रविवार दि. १० मार्च रोजी सकाळी ७.३० वा. पासून देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पूल दरम्यान महिलांसाठी मालवण तालुकास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली महिला मॅरेथॉन स्पर्धा आहे. “चला धावूया रक्तदान जनजागृती साठी.. चला धावूया प्लास्टिक मुक्तीसाठी.. चला सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी” हा संदेश या निमित्ताने देण्यात येणार आहे. 

स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच पहिला उत्तेजनार्थ आणि दुसरा उत्तेजनार्थ असे नंबर काढून या प्रथम पाच महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल दिले जाईल. स्पर्धेचे नियम, अटी,  अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी सौ.राधा केरकर 9021163580, सौ.नेहा कोळंबकर 9404920366, सौ.समृध्दी धुरी 9420437657, सौ.अनुष्का चव्हाण 9404546337, सौ. पल्लवी खानोलकर 90110 56317, सौ. सुविधा तिनईकर:- 94236 82114, सौ.वैशाली शंकरदास 9422392948, कविता वेंगुर्लेकर 99759 94952 यांच्याशी संपर्क साधावा. सर्व महिला ग्रुप, कॉलेज ग्रुप, सामाजिक संस्था, महिला बचत गट, सर्व महिला खेळाडू, सर्व माजी शालेय महिला ग्रुप यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन ग्लोबल रक्तविरांगना मालवण, ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!