टोपीवाला हायस्कूल मधील वाचक स्पर्धेत अस्मी, श्रेयस, अनुश्री गटानुक्रमे प्रथम

मालवण : मालवण एज्युकेशन सोसायटी, मालवण संचालित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल आणि ना. अ. दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय, मालवण यांच्यावतीने आयोजित तर ग्रंथालय विभागाने पुरस्कृत केलेल्या वाचक स्पर्धेत कु. अस्मी अशोक आठलेकर, कु. श्रेयस चंद्रशेखर बर्वे आणि कु. अनुश्री संजय वराडकर यांनी गटानुक्रमे प्रथम क्रमांक मिळवला.

प्रशालेच्या मध्यवर्ती सभागृहात ही वाचक स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी गणित व विज्ञान शिक्षक श्री. प्रभुखानोलकर सर तर अध्यक्ष म्हणून मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. वेरलकर सर उपस्थित होते. वाचन संस्कृती जपायची असेल तर वाचकवर्ग वाढविण्यासाठी अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल आणि ना. अ.दे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय, मालवण ग्रंथालयकडून “वाचक स्पर्धा” आयोजित करण्यात येते. या स्पर्धेला विद्यार्थी वर्गाकडून उदंड प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा इयत्ता ५ वी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १० वी, इयत्ता ११ वी व १२ वी या तीन गटात घेण्यात आली. इयत्ता ५ वी ते ७ वी या गटात  कु. अस्मी अशोक आठलेकर (प्रथम),  कु. उत्कर्ष मदन भिसे (द्वितीय), कु. विराज सतिश शिंदे (तृतीय) व  कु. समीक्षा सखाराम तोतरे (उत्तेजनार्थ) क्रमांक मिळवला. तर इयत्ता ८ वी ते १० वी या गटात  कु. श्रेयस चंद्रशेखर बर्वे (प्रथम),  कु. सुधीर संदीप आरस  (द्वितीय),  कु. संस्कृती मंगेश नाईक (तृतीय) व सई बलराम सामंत व आर्या अजित राणे (उत्तेजनार्थ) यश प्राप्त केले. इयत्ता ११ वी व १२ वी या गटात कु. अनुश्री संजय वराडकर (प्रथम), कु. गायत्री संतोष गांवकर (द्वितीय), व कु. ओम सुमित मसुरकर (तृतीय) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी श्री. धामापूरकर सर, श्री. वेरलकर सर, श्री. आजगावकर सर, सौ. बांदेकर मॅडम, सौ. तांबे मॅडम व सौ. तोरस्कर मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रास्ताविकातून शालेय ग्रंथपाल सुमित मसुरकर यांनी यावर्षीची ही स्पर्धा आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक, थोर साहित्यिक, आदरणीय गुरुवर्य कै. प्रकाश प्रभू सर यांना आदरांजली म्हणून समर्पित केली आहे असे सांगून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. परीक्षकांतर्फे सौ. बांदेकर मॅडम व सौ. तोरस्कर मॅडम यांनी विचार मांडले. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे श्री. प्रभूखानोलकर सर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ज्यांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला त्या गुरुवर्य कै. प्रकाश प्रभू सरांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन सौ. अस्मिता कदम यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री. धामापूरकर सर यांनी सहकार्य केले. ही “वाचक स्पर्धा” प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वळंजू सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!