पेंडूर रायवाडी येथील गवळदेव मंदिर परिसरात मनसेच्या माध्यमातून सोलर लाईट
मालवण : मालवण तालुक्यातील पेंडूर रायवाडी येथे गवळदेव मंदिर बांधण्यात आले आहे. त्याठिकाणी सोलर लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी मनसेकडे केली होती. याची दखल घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी आणि मालवण तालुका संपर्क अध्यक्ष नंदकिशोर तळवडेकर यांच्या माध्यमातून उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या हस्ते येथील ग्रामस्थ प्रशांत परब व सातेरी मंदिराचे मानकरी गुंडू राऊळ यांच्याकडे ही लाईट सुपूर्द करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी मनसेचे आभार मानले आहेत.