प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरचा पुढाकार
मालवण तालुक्यातील असरोंडी गावात मोफत वॉटर फिल्टरचे वाटप
मालवण | कुणाल मांजरेकर
भाभा ऍटोमॅटिक रिसर्च सेंटर, मुंबई या संस्थेमार्फत असरोंडी गावातील स्थानिक कुटुंबाना मोफत वॉटर फिल्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी भाभा ऍटोमॅटिक रिसर्च सेंटरचे श्री. ब्राम्हणे स्वतः उपस्थित होते. गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा ह्या उद्देशाने हे फिल्टर वाटप करण्यात आले. माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीचे शिक्षक कमलेश गोसावी यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यातून हे फिल्टर असरोंडी गावाला प्राप्त झाले. आपली ओळख ज्या गावामुळे निर्माण झाली, त्या गावासाठी काहीतरी चांगलं करायच्या उद्देशानेच आपण असरोंडी गावाला फिल्टर मिळावेत यासाठी मेहनत घेतल्याचे कमलेश गोसावी यांनी सांगितले.
गावातील मंडळींनी BARC चे श्री. ब्राम्हणे तसेच श्री. गोसावी सर यांचे आभार मानले. हे वितरण करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे देखील सहकार्य लाभले. फिल्टर वितरण प्रसंगी सरपंच अनंत पोईपकर, उपसरपंच आदित्य सावंत, सदस्य अजय गावडे, संदीप सावंत, प्रशाला सचिव सावंत सर, प्रदिप सावंत, सत्यविजय गावकर, दीपक माने, माजी सरपंच दिलीप घाडीगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.