भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून ५० % सवलतीच्या दरात सायकल, एलईडी टीव्ही वितरणाचा मालवणात शुभारंभ
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते शुभारंभ ; पहिल्याच दिवशी नोंदणीसाठी ग्राहकांची झुंबड
२५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत भाजपा कार्यालयात होणार वितरण ; नोंदणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार लाभ
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५०% सवलतीच्या दरात सायकल आणि एलईडी टीव्ही वितरणाचा मालवणात भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी नोंदणी साठी ग्राहकांनी येथे झुंबड उडाली होती. २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर पर्यंत भाजपा कार्यालयात या वस्तूंसाठी नोंदणी व वितरण केले जाणार असून नोंदणी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी झुंबड करू नये, असे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
भाजपा कार्यालयात या सवलतींच्या वस्तू वितरणाचा शुभारंभ झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, गणेश कुशे, जगदीश गांवकर, आबा हडकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, ओबीसी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पूजा वेरलकर, शहर अध्यक्ष चारुशीला आचरेकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, पूजा सरकारे, राणी पराडकर, महिमा मयेकर, दिव्या कोचरेकर, महानंदा खानोलकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, पंकज पेडणेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बंड्या पराडकर, विलास मुणगेकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, दत्तात्रय केळुसकर, राजू बिडये, निनाद बादेकर, राज कांदळकर, राजा मांजरेकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचरेकर, प्रशांत बिरमोळे, बाबू कासवकर, ओंकार लुडबे, यशवंत मालंडकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने नेहमीच जनतेचे हित लक्षात घेऊन असे वैविध्यपूर्ण उपक्रम होत असतात. आजही ५० % सवलतीच्या किंमतीत सायकल, टीव्ही येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या टीव्हींना एक वर्षाची वॉरंटी देखील आहे. असे उपक्रम फक्त निलेश राणे आणि राणे कुटुंबच राबवू शकतात. या सवलतीच्या वस्तूंचा जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी
.
यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, मालवण शहर आणि तालुका भाजपच्या वतीने आज निलेश राणे यांच्या प्रयत्नातून टीव्ही व सायकल निम्म्या किमतीला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाढत्या महागाई मध्ये जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यापूर्वी देखील दीड वर्षांपूर्वी मालवणात आटा चक्की व वॉटर प्यूरिफायर निलेश राणे यांच्या माध्यमातून सवलतीच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला होता. नागरिकांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने पडताळणी करून सायकल आणि टीव्हीची खरेदी करावी. येथील जनतेला स्वस्त दरात वस्तू मिळाल्या पाहिजेत, या प्रामाणिक भावनेतून राणे साहेबानी ही सेवा व संधी उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी ५१ इंची पर्यंत टीव्ही उपलब्ध असून मालवण नंतर देवगड मध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. येथे नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला वस्तू मिळणार आहे, असे सुदेश आचरेकर म्हणाले. प्रस्ताविक कैलास राणे यांनी करून ग्राहकांनी गर्दी न करता या वस्तूंचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
शुभारंभाच्या निमित्ताने सायकल आणि टीव्ही खरेदीसाठी भाजपा कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी दत्ता सामंत यांनी शुभारंभाची सायकल नोंदणी करून यशवंत मालंडकर यांना ती सायकल भेट दिली.