शिवसेना ठाकरे गटाकडून मालवण तालुक्यात पदाधिकारी नियुक्त्या
वराड पं. स. उपविभागप्रमुखपदी शिशुपाल राणे, पेंडूर पं. स. उपविभागप्रमुखपदी उमेश प्रभू तर दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची निवड
आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले अभिनंदन
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मालवण तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
यामध्ये वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुखपदी शिशुपाल राणे, पेंडूर पंचायत समिती उपविभागप्रमुख पदी उमेश प्रभु तसेच दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याला मिळालेल्या पदाला न्याय देऊन संघटना वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, कृष्णा पाटकर, सचिन मालवणकर, स्वप्नील आचरेकर, नरेश हुले, सिद्धू मांजरेकर, महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर, बाबु वाघ, उमेश चव्हाण, युवतीसेना शहरप्रमुख सुर्वी लोणे, अनिल वाक्कर आदी उपस्थित होते.