भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती, वर्दे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता
वर्दे फातरीचे गाळू, राणेवाडी रस्त्यासाठी, नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर
कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २ कोटी ३०लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात झालेल्या जनसंपर्क अभिनयानानंतर निलेश राणे यांनी विविध स्थरावरून कुडाळ व मालवण साठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्याजवळ निलेश राणे यांनी खासदार निधीसाठी मागणी केली होती.
जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर कामांच्या भूमीपूजनासाठी निलेश राणे हे वर्दे येथे आले असता ग्रामस्थांनी वर्दे फातरीचे गाळू येथील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यावेळी वर्दे फातरीचे गाळू रस्त्याकरिता निधी देण्याचे आश्वासन निलेश राणे यांनी वर्दे ग्रामस्थांना दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत निलेश राणे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वर्दे रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.याबद्दल वर्दे बूथ प्रमख योगेश परब, विभागीय अध्यक्ष गुंडू बुवा सावंत, तुषार सावंत यांनी तसेच वर्दे ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे व केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.