उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानाबाबत मार्गदर्शन
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ५८ एनसीसी बटालियन सिंधुदुर्ग विभाग येथे प्रशिक्षणसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये अपघात कमी करण्याच्या दृष्टीने Walk on Right, हेल्मेट – सीटबेल्ट वापरणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, वाहतुकीची चिन्हे, लेन डिसिप्लिन, Good Samaritan याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच रस्त्यावर वाहन चालवताना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आदेश देणारी चिन्हे , सावधानतेची व माहिती दर्शवणारी चिन्हे व गोल्डन हावर्स याविषयी प्रॅक्टिकल घेऊन मार्गदर्शन करण्यात आहे. कार्यक्रमास सहायक मोटर वाहन निरीक्षक अरुण पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक नितीन पाटील, गोविंद वराडकर यांच्यासह ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी उपस्थित होते.