मालवण येथील प्रवीण प्रभू यांचे निधन
मालवण : मालवण मेढा येथील रहिवासी प्रवीण जीवन प्रभू (वय ४९) यांचे आज दुपारी गोवा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
प्रवीण प्रभू हे पव्या या नावाने मालवणात परिचित होते. मे २०२१ मध्ये झालेल्या तौक्ते वादळात डोक्यावर नारळ पाडून ते गंभीर जखमी झाल्याने गेली दोन वर्षे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र पुन्हा प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगी, भाऊ, बहीण, दोन भाची असा परिवार आहे. अलीकडेच निधन झालेले दिवंगत पत्रकार सदा वराडकर यांचे ते जावई होत.