पणदूर घोटगे मुख्य रस्ता कळसुली येथे पाण्याखाली, निलेश राणेंकडून पहाणी
निलेश राणे यांच्या सुचनेनंतर कळसुली दिंडवणेवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू.
कुडाळ : सततच्या अतिवृष्टीमुळे कळसुली दिंडवणेवाडी प्रकल्पात पाणीसाठा वाढला असून त्यामुळे पणदूर घोटगे मार्गावरील वाहतुक गेले चार दिवस बंद आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी कळसुली धरण क्षेत्रातील बुडीत रस्त्याची पहाणी केली होती. त्यानंतर निलेश राणे यांच्याकडून रस्ता लवकरात लवकर मोकळा व्हावा यासाठी पाण्याचा विसर्ग वाढविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या. मात्र सततच्या अतिवृष्टीमुळे विसर्गाच्या चौपट पाणी पुन्हा धरणक्षेत्रात जमा होत आहे. निलेश राणे यांच्या सुचनेनंतर विसर्ग सुरू असून पावसाचे प्रमाण कमी झाल्यास पणदूर घोटगे रस्ता वाहतुकीस मोकळा होईल.