ढगफुटी सदृश्य पावसात दिसली माजी नगरसेवक यतीन खोत यांची तत्परता ….
खंडीत वीज प्रवाह सुरु करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यासह स्वतः फिल्डवर ; रस्त्यावर आलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठीही सहकार्य
वीज वितरण, नगरपालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांची मोलाची मदत
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरात गुरुवारी दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात माजी नगरसेवक यतीन खोत यांची तत्परता पाहायला मिळाली. मुसळधार पावसाने शहरात ठिकठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडाच्या फ़ांद्या कोसळून वीज प्रवाह खंडित झाला. हा वीज प्रवाह सुरु करण्यासाठी यतीन खोत हे स्वतः वीज कर्मचाऱ्यांसह फिल्डवर उतरले. तसेच रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी मार्गस्थ होण्यासाठी हातभार लावला. या कामांसाठी स्थानिक नागरिकांचे आणि विज वितरणच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे यतीन खोत यांनी सांगितले.
गुरुवारी मालवणला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे शहरात अनेक ठिकाणी विज वाहिन्यांवर फ़ांद्या पडून विज प्रवाह खंडित झाला. तसेच शहरात अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. यातील चिवला बीच समुलबाग, टोपीवाला हायस्कुल परिसर, कन्याशाळा परिसर, भरड पांजरीवाडा, रेवतळे आदी भागात माजी नगरसेवक यतीन खोत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून मदत कार्य केले. विज वाहिन्यांवर पडलेल्या फांद्या वीज कर्मचाऱ्यांच्या मदतीने तोडून वीज प्रवाह सुरळीत करण्यास सहकार्य केले. यासाठी रोमन विठ्ठल, कृष्णा परब, राजाराम शिंदे, अक्षय चव्हाण, रुपेश परब आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कामी स्थानिक नागरिकांनी देखील मोलाची मदत केली. यात प्रामुख्याने रुपेश कांबळी, मांजरेकर सर, सुधीर कांदळकर, रतन मयेकर, मनोज शिरोडकर, विजय केळूसकर, मनोज मयेकर, शैलेश चिंदरकर, शुभम माने, शुभम बारामती, श्री. फर्नांडिस यांच्यासह अन्य नागरिकांचा सहभाग होता.