देवगड – फणसगाव येथे वीजेच्या पोलावरून पडून कंत्राटी कामगार जखमी
उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल ; कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस
मालवण | कुणाल मांजरेकर
महावितरण कंपनीमध्ये देवगड तालुक्यातील फणसगाव सेक्शन मध्ये कार्यरत असलेले कंत्राटी कामगार प्रभाकर आप्पा तेली (कनिष्ठ तंत्रज्ञ) हे शनिवारी १५ जुलै रोजी सकाळी ११ वा. च्या दरम्यान मुटाट घाडीवाडी येथे एल टी लाईनचे काम करित असताना पोलवरून खाली पडुन गंभीर जखमी झाले. त्यांच्या पाठीच्या मणक्याला मार लागला असून स्थानिक ग्रामस्थ तसेच सहकारी कामगार सुधीर तेली, विनोद गुरव यांनी त्यांना उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच कंत्राटी कामगार कामगार नेते अशोक सावंत यांनी गोवा बांबुळी रुग्णालयात धाव घेऊन जखमी कर्मचाऱ्याची विचारपूस करून धीर दिला.
यावेळी कंत्रादार यांना फोन करून गोवा बांबुळी येथे बोलवण्यात आले. त्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, रुपेश पवार, रुपेश जाधव, महेश राऊळ ,भाऊ प्रकाश तेली उपस्थित होते. या अपघात प्रसंगी अशोक सावंत यांनी दाखवलेल्या तत्परते बाबत कंत्राटी कामगारांकडून समाधान व्यक्त होत आहे.