सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी परीक्षेत “एमआयटीएम” कॉलेजचे उल्लेखनीय यश
अनुज जेठे महाविद्यालयात प्रथम तर शंकर घाडगे आणि ओंकार कदम द्वितीय, तृतीय क्रमांकाचे मानकरी
मालवण : मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाऊंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदवी परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील अनुज जेठे (८.१९) याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर शंकर घाडगे (८.०६) आणि ओमकार कदम (७.९१) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या विद्यार्थ्यांना कॉलेजचे सिव्हिल विभाग प्रमुख तथा एक्झाम डीन प्रा. विशाल कुशे आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सचिव नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, प्राचार्य सूर्यकांत नवले, अकॅडमिक डीन पूनम कदम, ऍडमिनिस्टेटिव ऑफिसर राकेश पाल यांनी अभिनंदन केले आहे.