राज्य सरकारच्यावतीने ३६० युवक- युवतींना मिळणार जलपर्यटन, शोध व बचावाचे मोफत प्रशिक्षण

तारकर्ली येथील इसदाच्या प्रशिक्षण संस्थेत मिळणार प्रशिक्षण ; १२ जुनपर्यंत नावनोंदणी

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली येथील इसदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये होतकरू युवक युवतींना जलपर्यटन, शोध व बचावाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ३६० होतकरू युवक युवतींना याचा लाभ मिळणार आहे.

जलपर्यटन व आपत्ती व्यवस्थापनमध्ये बोट चालविणे, जीवरक्षक, बचाव, स्कुबा डायव्हिंग चे महत्व ओळखून राज्यातील ३६० युवक व युवती यांना जीव रक्षक, पॉवर बोट हॅडलिंग व स्कुबा डायविंग याचे मोफत प्रशिक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत आयोजित केले आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधील ५ जणांना जीवरक्षक व पॉवर बोट हॅडलिंग व ५ जणांना बचाव स्कुबा व यातील एक डाईवमास्टर असे रू. ६०,००० ते १,६०,००० पर्यंतचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. यात निवास व भोजन याची पण मोफत सोय केलेली आहे… सदर प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून यासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्ष, कमीतकमी १०वी पास, व वजन ५५ किलोपेक्षा जास्त असावे असे निकष आहेत. सदरसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या खालील वेबसाईटवर आगावू अर्ज नोंदणी चालू आहे. अर्ज नोंदणी १२ जून २०२३ ला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असून या साईट वर प्रशिक्षण निवडीसाठी निवड तारीख व स्थळे यांची माहिती देण्यात आली आहे. www.mtdc.co या लिंकवर
अर्ज उपलब्ध असून ते online भरायचे आहेत. https://forms.gle/AmMsdMVtek5ZpEvW9

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!