राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, उद्योजक सतीश आचरेकर कार्यकर्त्यांसह शिवसेनेत !

सिंधुदुर्ग दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतकेला प्रवेश

मालवण : मालवण येथील मत्स्य व पर्यटन उद्योजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सतीश आचरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सतीश आचरेकर यांना भगवी शाल घालून तसेच हाती भगवा देत शिवसेनेत स्वागत केले.

सिंधुदुर्गच्या मत्स्य व पर्यटन उद्योग क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणून सतीश आचरेकर यांची ओळख आहे. सोबतच सामाजिक क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. गेली काही वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहरअध्यक्ष म्ह्णूनही त्यांनी काम केले आहे. मोठा मित्रपरिवार असलेले नेतृत्व अशी सतीश आचरेकर यांची ओळख आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता वेंगुर्ला येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी सतीश आचरेकर व सहकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कुडाळ मालवण प्रमुख बबन शिंदे यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षप्रवेश वेळी सतीश आचरेकर यांच्यासोबत रोहन आचरेकर, आंनद आचरेकर, वैभव मयेकर, राज जाधव, बाबल नरोना, जपा नरोना, जलेंद्र करंगुटकर, तुषार मसुरकर, प्रदीप कुर्लेकर, दैवेश मयेकर, मंगेश गोवेकर, ऑलविन फर्नांडिस, अक्षय मिठबावकर, विकी शिंदे, मंगेश आढाव, सर्वेश पराडकर, दर्पण सादये, चेतक पराडकर यासह सुमारे ३०० पेक्षा जास्त युवक, तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला अशी माहिती देण्यात आली आहे. सतीश आचरेकर यांच्या पक्षप्रवेशाने मालवणात शिवसेना पक्षाला बळ मिळाले आहे. आगामी काळात आणखी काही मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. असेही यावेळी सांगण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!