Category News

शिवडाव हायस्कूलच्या गणेश दाभोळकरची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड…!

कणकवली I मयुर ठाकूर : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेचा विद्यार्थी कु. गणेश विनोद दाभोळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे तो आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो आता विभागीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे…

… त्यासाठी आमदार वैभव नाईक यांचाच पाठपुरावा !

मालवण : महाराष्ट्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा मंजूर झाला. याचे श्रेय कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांचे आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी डिझेल परतावा संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…

परमहंस भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ रोजी.!

कणकवली I मयुर ठाकूर : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ जानेवारी रोजी कणकवली कॉलेज कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले आहे. संस्थानचा प्रवेश अर्ज भरून…

हळवल फाट्यावरील अपघात प्रकरणी महामार्ग ठेकेदार व प्राधिकरणवर गुन्हा दाखल करा !

टोलमुक्त कृती समितीच्या वतीने कणकवली पोलीस निरिक्षकांना निवेदन सादर कणकवली I मयुर ठाकूर : हळवल फाटा येथे झालेल्या आरामबसच्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात आणखी काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. हा अपघात व यापूर्वी याठिकाणी घडलेल्या अपघातास…

वायरी भुतनाथ गावातील रिक्त पोलीस पाटील पद भरा…

सरपंच भगवान लुडबे यांच्यासह ग्रामस्थांची मालवण महसूल प्रशासनाकडे मागणी मालवण : सुमारे २,८९२ लोकवस्ती असलेल्या वायरी भुतनाथ गावात गेली २० वर्षे पोलीस पाटील पद रिक्त आहे. दाखले व अन्य कामांबाबत ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तरी गावातील पोलीस पाटील पद भरण्यात…

युती शासनाचा दिलासा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मत्स्य सोसायट्यांना डिझेल परतावा ; अन्य प्रश्नही मार्गी

मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ना. रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे मच्छीमारांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्यविकास सोसायट्यांना भाजपा – शिंदे सरकारने दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील सोसायट्यांना यापूर्वी हक्काच्या डिझेल परताव्यासाठी शासनाकडे हाजी हाजी करावे…

हळवल फाट्यावर अपघाताचे सत्र सुरूच ; लक्झरी बस उलटून दोघांचा मृत्यू

६ जण गंभीर जखमी ; उर्वरित २७ जणांवर उपचार सुरू कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली शहरा लगत असणाऱ्या हळवल फाट्यावर आज गुरुवारी पहाटे ५:३० वा च्या सुमारास मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी (ए आर १६ ए ७२७७) पलटी होऊन…

दांडेश्वर मंदिरातील रक्तदान शिबिरात ५० जणांनी केले रक्तदान

दांडी गाव आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणच्या वतीने आयोजन…. मालवण : श्री देव दांडेश्वर जत्रेचे औचित्य साधून दांडी गाव आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान मालवणच्या वतीने दांडेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात…

शिक्षकाचे बस प्रवासात निधन ; फोंडाघाट येथील घटना

कणकवली : मयूर ठाकूर सरमळे ता. सावंतवाडी येथील देऊळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हरिभाऊ रामभाऊ घोगरे (वय ५३) यांचे प्रवासा दरम्यान कदंबा बस मध्ये हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हा प्रकार आज दुपारी कणकवली फोंडाघाट प्रवासा दरम्‍यान घडला. ते आपल्या परभणी…

शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत कै. आतू फर्नांडिस यांना श्रद्धांजली

मालवण | कुणाल मांजरेकर मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर शिवसैनिक आतू फर्नांडिस यांचे नुकतेच अकाली निधन झाले. बुधवारी मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बैठकीत दिवंगत आतू फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला. येथील लिलांजली…

error: Content is protected !!