अभिमानास्पद ! राजपथावरील संचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
आचरा : दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथा समवेत दिवली नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावेळी आणखी एक विशेष बाब म्हणजे मालवण तालुक्यातील आचरा या गावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या संचलनात सहभागी होता आले. या पथसांचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिवली हे समई नृत्य सादर केले या नृत्याने सर्वांचे लक्ष घेतले होते.
या राजपथावरील संचलनात आचरा कॉलेजचे हर्षाली लाड, स्नेहल देसाई, तनुजा देसाई, मयुरी मुणगेकर, साक्षी लाड, करीना खराडे, गौरव लाड, हर्षद मेस्त्री, रितेश गोलतकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते यांना यावेळी प्रसिद्ध कोरिओग्राफर प्राची राणे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे अध्यक्ष डॉ.प्रदीप मिराशी, कार्याअध्यक्ष प्रदीप परब मिराशी, महाविद्यालयाचे कमिटी चेअरमन संजय मिराशी, आचरा हायस्कुल कनिष्ठ विद्यालय कमिटी चेअरमन नीलिमा सावंत, इंग्लिश मिडीयम कमिटी चेअरमन निलेश सरजोशी, प्राचार्य गुरुदास दळवी, अन्य शाखांचे मुख्याध्यापक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.