मालवणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्षांकडून पहाणी
मालवण : गणेशोत्सव पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कामांची पहाणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नुकतीच केली. यावेळी बांधकाम सभापती मंदार केणी, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मालवण शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम दांडी प्रभागापासून सुरू करण्यात आले आहे. शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. शहरात झाडी कटाईचे कामही सुरू असून ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. गणेश विसर्जन ठिकाणीही साफसफाई करणे, आवश्यक ठिकाणी बांधकाम करणे, लाईट व्यवस्था करणे त्या बरोबरच देऊळवाडा येथील गाळ काढणे. मोरेश्वर किनारा येथे विसर्जन साठी रस्ता तयार करणे, या कामांबाबत नियोजन करण्यात आले आहे. लवकरच सर्व कामे पूर्ण केली जातील. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.
६५० घरांच्या ठिकाणी डास फवारणी पूर्ण
मालवण शहरात डास फवारणी मोहिमही गेले काही दिवस प्रभावीपणे सुरू आहे. ६५० घर परिसरात डास फवारणी करण्यात आली असून फवारणी मोहीम सुरू असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.