सतीश सावंत यांचा पलटवार … “ते” दोन सदस्य पुन्हा शिवसेनेत !

फसवणूक करून आपला प्रवेश घडवून आणल्याचा आरोप

कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणारे गांधीनगर (भिरवंडे) गावच्या दोन सदस्यांनी शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुनिता अनाजी सावंत, प्रसन्ना प्रशांत सावंत अशी या सदस्यांची नावे असून आमचा प्रवेश नव्हे तर आमची फसवणूकच झाली, आम्ही शिवसेना नेते सतीश सावंत यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याची प्रतिक्रिया या सदस्यांनी दिली. तर महिलांची फसवणूक करत भाजपा नेत्यांनी केलेला प्रवेशाचा प्रकार निंदनीय असल्याचा आरोप तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी केला आहे.

शिवसेना नेते, माजी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेला समर्थन त्या दोन महिला सदस्यांनी दिले. यावेळी गांधीनगर उपसरपंच राजेंद्र सावंत, शिवसेना उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत, बेनी डिसोजा, व्हाईस चेअरमन शेखर सावंत, पंचायत समिती माजी सदस्य मंगेश सावंत, बंडू ठाकूर, संजय सावंत आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रथमेश सावंत म्हणाले, गांधीनगर सरपंच व ३ सदस्य यांनी सकाळी भाजपात प्रवेश केला. वास्तविक त्या महिलांना फसवून नेण्यात आले. आपण विकास कामांवर चर्चा करुयात असे सरपंच मिलिंद बोभाटे यांनी सांगितले. आमदारकीच्या निवडणुकीत केवळ ६ मते नितेश राणे यांना होती. ती मते बोभाटे यांचीच होती. आता भरघोस निधी देणार, पैसे देतो, अशी फुस लावून त्यांना
नेले.

महिला सदस्य सुनिता सावंत म्हणाल्या, आम्हाला सरपंच बोभाटे यांनी आमदार नितेश राणे यांना भेटायला जाऊ, विकास कामांवर चर्चा आहे असे सांगितले. मात्र आम्हाला हा प्रवेश मान्य नव्हता. बोभाटे यांनी आम्हाला गोट्या सावंत यांच्या घरी नेलं. तेथून आ. नितेश राणे यांच्या घरी नेलं, मात्र आम्ही सतीश सावंत यांच्या सोबत राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!