मालवण बंदर जेटी नजीक छप्पर कोसळले ; सुदैवाने महिला सुदैवाने बचावली

मालवण : मालवण शहरातील बंदर जेटी मांडवी वाडा येथे घराचे छप्पर कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. यावेळी घरात असलेल्या मीना लुगेरा यांच्या हातावर विटा कोसळल्या. मात्र सुदैवाने त्या बचावल्या.

छप्पर कोसळलेले घर मार्शलीन घाब्रियल डिसोझा कुटुंबीय यांचे असून ते देवगड येथे राहतात अशी माहिती उपस्थितांनी दिली. दरम्यान मीना लुगेरा यांच्या घराचे काम चालू असल्याने त्या आपला मुलगा प्रियेश याच्या सोबत डिसोझा यांच्या घरात राहत होते. शुक्रवारी दुपारी मीना या जेवण घेऊन स्वयंपाक घराच्या बाहेरील खोलीत येत असताना छप्पराचा आवाज झाला व काही विटा मीना यांच्या हातावर पडल्या. त्या दुसऱ्या खोलीत पोहचताच स्वयंपाक घरातील पूर्ण छप्पर कोसळले. सुदैवाने मीना या बचावल्या. आजूबाजूचे शेजारी विली डिसोझा व कुटुंबीय, डेनिस लुगेरा व अन्य नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तलाठी यांनीही पाहणी केली. पूर्ण छप्पर कोसळून घरात विटांचा चक्काचूर झाला होता. घरातील साहित्यांचेही नुकसान झाले होते. प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्याची कार्यवाही करण्यात येत होती. गेले काही दिवस कोसळत असलेला मुसळधार पाऊस व वारा यामुळे नुकसानीच्या घटना घडत आहेत. या दरम्यान या छप्पर कोसळण्याच्या घटनेची नोंद शुक्रवारी झाली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3584

Leave a Reply

error: Content is protected !!