सोनवडे घाट रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार : निलेश राणे यांची ग्वाही

स्थानिक आमदार, खासदार निष्क्रिय असल्यानेच रस्त्यांची दुरावस्था

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचा आंब्रड आणि कडावल जि. प मतदार संघात झंझावाती दौरा

कुडाळ : भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज कुडाळ तालुक्यातील आंब्रड आणि कडावल या मतदारसंघातील गावभेट दौऱ्यादरम्यान सोनवडे येथून कोल्हापूरला जोडणारा आणि सुरक्षित आणि तिथे जवळच असलेला घाट रस्त्याची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. गेली आठ वर्षे येथील खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक हे लोकांची फसवणूक करत असून दररोज नव्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत आहेत. आठ वर्षे घाटरस्ता होणार होणार माणूस म्हणून त्यांनी आमची निराशा केली आहे अशी तक्रार ग्रामस्थांनी निलेश राणे यांच्याकडे केली.

या घाट रस्त्याची सुरुवात २००९ च्या दरम्यान राणेसाहेब पालकमंत्री असताना त्यांच्या हस्ते झाली. त्यामुळे आता हे काम राणे साहेबांचे पुत्रच पूर्णत्वास नेऊ शकतात, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की सोनवडे घाटमार्गाची मुहूर्तमेढ राणे साहेबांनी रोवली. कुडाळ तालुक्यातील सर्वाधिक कमी लांबीचा हा घाटरस्ता आहे मात्र केवळ राणे द्वेषापोटी रस्ता ८ वरून २४ किमी करण्याचा डाव पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी आखला. मात्र ज्या ठिकाणी राणेसाहेबांनी भूमिपूजन केलं, त्याच ठिकाणाहून घाटरस्ता होईल. या रस्त्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरावर पाठपुरावा करून त्या संदर्भात असणाऱ्या अडीअडचणी संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून जाणून घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडून तुमच्या भेटीला परत येणार, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचप्रमाणे या भागातील मठ पणदूर घोडगे या राज्य महामार्गाची देखील निष्क्रिय आमदार खासदारांमुळे झालेली दुरावस्था संदर्भात ग्रामस्थांनी लक्ष वेधल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारच्या कडून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले.


या पाहणीदरम्यान घोटगे-जांभवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, तालुकाध्यक्ष दादा साईल, विनायक राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुप्रिया वालावलकर, तालुका सरचिटणीस देवेन सामंत,  माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, पप्या तवटे, स्नेहा सावंत, माजी पं. स. सदस्य बाळू मडव, नारायण गावडे, शक्तिकेंद्र सचिन तेली, अनिल परब, सरपंच अमोल तेली, दिलीप तवटे, अर्चना मडव आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!