OBC आरक्षण : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायत निवडणूका स्थगित

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कुणाल मांजरेकर

मुंबई : राज्यातील ९२ नगर परिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. सध्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कमी पाऊस असलेल्या क्षेत्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणूका १८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र सध्या ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या निवडणुका स्थगित करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगिती देण्यात आली असून सुधारित निवडणूक कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणूक कार्यक्षेत्रात आचार संहिता देखील मागे घेण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!