आमदार नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली “ही” मागणी
कुणाल मांजरेकर
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून “द काश्मीर फाईल्स” हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी आ. राणेंनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूचं चित्रण या चित्रपटात केलं आहे. दोन दिवसांत ह्या चित्रपटाने हाऊसफुल्ल कमाई केली असून हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा, यासाठी त्याला करमुक्त करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, जम्मू काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणारा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा. त्यामुळे जम्मू काश्मीर मधील हिंदू समाजावर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा हि विनंती, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.