डॉ. शशिकांत झाट्ये यांचा एकता मित्रमंडळाने केला सत्कार

मालवण : मालवण येथील एकता मित्रमंडळाच्या वतीने येथील ज्येष्ठ सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. शशिकांत झांट्ये यांचा सत्कार करण्यात आला.

मित्रमंडळाच्या वतीने वनभोजनाच्या निमित्ताने रविवारी हा सत्कार करण्यात आला. डॉ. झांट्ये यांच्या हातची औषधे घेऊन आज मालवण मधील तिन्ही पिढ्यांना गुण येतो. तसेच रुग्णांशी बोलण्याच्या पद्धतीमुळे रुग्ण आपलासा होऊन अर्धा अधिक त्यांच्या भाषेमुळे बरा होतो. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून एकता मित्रमंडळातील एक जेष्ठ सदस्य असलेल्या डॉ. शशिकांत झांट्ये यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टरांनी आपल्या आठवणींना ऊजाळा दिला आणि भविष्यात अशाच प्रकारे एक राहून येणाऱ्या संकटांना कशाप्रकारे तोंड देणे सोपे जाते, त्यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!