मठबुद्रुक येथील स्वच्छतागृह उभारणीचा उपसभापतींच्या हस्ते शुभारंभ

तीन लाखांचा निधी उपलब्ध : विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात होणार स्वच्छतागृह

मालवण : स्वच्छ भारत मिशन योजनेतून मठबुद्रुक येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. तीन लाख रुपये निधीतून हे काम होणार असल्याची माहिती उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली आहे.

यावेळी जनार्दन सावंत, अनिल बुधवळेकर, संभाजी गोलतकर, मारुती गोलतकर, संजय केळुसकर, जिजी केळुसकर, उदय सावंत, पांडुरंग मुळये, ज्युनिअर इंजिनियर माने यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मंदिरात अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या परिसरात स्वच्छतागृह उभारावे ही मागणी उपसभापती राजू परुळेकर यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!