“तो” जीर्ण विद्युत पोल बदलला ; नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांची तत्परता !

नागरिकांतून समाधान ; पाटकर, गावकर यांनी वीज वितरणचे मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : शहरातील देऊळवाडा जुना ऑक्ट्राय नाका येथील महापुरुष मंदिरा नजीक जीर्ण झालेला विद्युत पोल अखेर बदलण्यात आला आहे. कसाल- मालवण महामार्गावरील हा धोकादायक वीज पोल बदलण्यासाठी नगरसेवक दीपक पाटकर आणि जगदिश गावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार महावितरणचे शहर अभियंता श्री. भुजबळ यांनी हे काम मार्गी लावल्याबद्दल श्री. पाटकर आणि श्री. गावकर यांनी महावितरणचे आभार मानले आहेत.

सदरील वीज पोल जीर्ण झाल्याने धोकादायक बनला होता. कसाल- मालवण मुख्य महामार्गावर हा पोल असल्याने हा पोल बदलण्यासाठी नगरसेवक दीपक पाटकर आणि स्थानिक नगरसेवक जगदीश गावकर यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी शहर अभियंता श्री. भुजबळ यांनी दोन महिन्यांत हा पोल बदलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सदरील वीज पोल अग्रक्रमाने बदलण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, जगदीश गावकर यांच्यासह बाळू मालवणकर, कमा गावकर, पांडुरंग फणसेकर, श्री. बांदेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. सदरील धोकादायक वीज पोल बदलण्यात आल्याबद्दल स्थानिकांनी आभार मानले आहेत. तर महावितरणचे शहर अभियंता श्री. भुजबळ यांनी प्राधान्याने हा पोल बदलल्या बद्दल श्री. पाटकर आणि श्री. गावकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!