मालवणच्या बोर्डिंग मैदानावर २ ते ९ मार्च पर्यत रंगणार “एमपीएल” लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार…

मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष गौरव लुडबे यांची माहिती ; ९ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव 

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने २ ते ९ मार्च या कालावधीत मालवण येथील बोर्डिंग मैदानावर एमपीएल लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे यंदा आठवे पर्व आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ५५,५५५ रोख रक्कम व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला ३३,३३३ रोख रक्कम व आकर्षक चषक दिला जाणार आहे, अशी माहिती मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व उपाध्यक्ष गौरव राजेंद्र लुडबे यांनी प्रसिद्धपत्राद्वारे दिली आहे. 

या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी जे संघमालक इच्छुक आहेत, त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा. या स्पर्धेचा खेळाडूंचा लिलाव ९ फेब्रुवारी २०२५ रोजी असेल. या स्पर्धेमध्ये सर्व संघातील खेळाडूंची निवड प्रक्रिया लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. तरी स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी प्रवेश अर्ज भरायचे आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून प्रवेश अर्ज भरायची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी आहे. खेळाडूंचे प्रवेश अर्ज गुड लाईफ मेडिकल, भंडारी हायस्कूल शेजारी, सोमवार पेठ मालवण येथे उपलब्ध आहेत.खेळाडूंनी फॉर्मसाठी पायस अलमेडा  9307915141 व साईराज हळदणकर 9764121892 यांच्याशी संपर्क करावा.

या स्पर्धेत संघ घेण्यासाठी इच्छुक संघ मालकांनी आपले संघ २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत फ्रँसिस फर्नांडिस 9834052882 व गौरव लुडबे 9420890110 यांच्या जवळ नोंदवावे. स्पर्धे संबंधित अधिक माहिती करिता ज्ञानेश केळूसकर 7875972436 व सुशील शेडगे 7499955147 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3979

Leave a Reply

error: Content is protected !!